Amity (ॲमिटी) विद्यापीठाच्या विस्तारासाठी भातण येथे १५ एकर जमीन मंजूर
महाराष्ट्र शासनच्या मंत्रिमंडळ बैठकीत ॲमिटी विद्यापीठच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भातण येथे १५ एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ निर्णयानुसार, ऑमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेला ही जमीन वर्ग-२ धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित संस्थेकडून कळजेखडकाची रक्कम भरल्यानंतर ही जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे.
या जागेचा वापर शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी करण्यात येणार असून त्यामध्ये खेळाची मैदाने, वसतिगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत हा निर्णय जाहीर करण्यात आला. राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


