“श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२६” जंगी कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल आयोजित “श्री. परेश ठाकूर केसरी पनवेल २०२६” या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि आखाड्यातील थरारक लढतींमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले होते.

या स्पर्धेत नितेश राणे यांच्या हस्ते आखाड्यात कुस्ती लावण्याचा मानाचा क्षण पार पडला. यावेळी त्यांनी परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करत त्यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, नगरसेवक हॅपी सिंग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.



