वाशी APMC मध्ये ACB ची धडक कारवाई; ₹१.४० लाखांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात अटकेत

0
32

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा–बटाटा मार्केटच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अँटी करप्शन ब्युरो (ACB) ने मोठी कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना ₹१.४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे APMC प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई ACB पथकाने ही कारवाई केली. मंजूर कामाचे बिल काढून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून १५ टक्के कमिशनची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली होती.
त्यानुसार ACB ने सापळा रचून डॉ. दीपक आवटे (प्रभारी उपसचिव, घनकचरा विभाग) आणि समीर म्हात्रे (जनरेटर ऑपरेटर तथा प्रभारी घनकचरा विभाग) यांना ₹१ लाख ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर APMC प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ACB कडून पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here