महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात बदल; आता स्वतंत्र ‘अनुसूचित जाती आयोग’

0
26
विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची सूचना : LC आणि मार्कलिस्टसाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही
विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची सूचना : LC आणि मार्कलिस्टसाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात बदल; आता स्वतंत्र ‘अनुसूचित जाती आयोग’

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग यांच्या नावात शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापुढे या आयोगाचा उल्लेख स्वतंत्रपणे “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग” असा करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे सदस्य सचिव एस. एन. पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अधिकृत पत्रव्यवहारात, अर्जात किंवा संपर्कासाठी “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग” असाच उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आयोगाकडे पत्रव्यवहारासाठी खालील पत्ता जाहीर करण्यात आला आहे :

प्रशासकीय इमारत, पहिला मजला, डेअरी विभाग, अब्दुल गफार खान मार्ग, वरळी सीफेस, मुंबई.
या निर्णयामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीत अधिक स्पष्टता येणार असल्याचे मानले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here