एनसीसी ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, कोल्हापूर यांच्यावतीने ३५० कॅडेट्सचे NCC भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्न.
एनसीसी ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, कोल्हापूर यांच्यावतीने ३५० कॅडेट्सचे NCC भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्न.
कोल्हापूर :
राष्ट्रीय छात्रसेना (NCC) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर – CATC 304 ११ ते २० मे या कालावधीत NCC भवन, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले.
हे शिबिर ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, NCC, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण ३५० कॅडेट्स सहभागी झाले होते.
शिबिरादरम्यान कॅडेटना ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, प्राथमिक उपचार आणि फिटनेसचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियम पालन, भारतीय सैन्यात प्रवेशाची माहिती आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांतील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. तसेच यावेळी कॅडेटनी स्वच्छ भारत अभियान आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती उपक्रम राबवले. या शिबिरामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली.
शिबिराचे आयोजन कर्नल विक्रम एस. नलवडे, कमांडिंग ऑफिसर, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसी अधिकारी, सहायक एनसीसी अधिकारी आणि प्रशिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.