MIT ADT विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक पराक्रम; ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

0
24

लोणी काळभोर :
MIT ADT Universityच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान तयार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे असलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या १०.५ फुटांच्या या विमानाची नोंद आता India Book of Records मध्ये करण्यात आली आहे.
पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, संशोधन वृत्ती आणि अपार मेहनतीचे प्रतीक मानले जात आहे. एरोस्पेस क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे.
या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी विमानाच्या डिझाईनपासून ते तांत्रिक चाचण्यांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकाईने काम केले. आधुनिक तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी आणि टीमवर्कच्या जोरावर हा विक्रम साकार झाला.
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यात अशाच संशोधनाधारित आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here