वनसंवर्धनासाठी तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेवर भर; नाशिक येथे वन विभागाची आढावा बैठक

0
27

नाशिक:
गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे वन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. राज्यातील वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय आव्हानांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीचा मुख्य उद्देश राज्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांचा आढावा घेणे तसेच स्थानिक पातळीवरील विविध समस्यांवर प्रभावी तोडगा काढणे हा होता. नाशिकसह राज्यभरातील वनविभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत ३०० कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. तसेच वाढत्या बिबट्या-मानव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वणवे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, वन विभागातील ई-गव्हर्नन्स आणि पारदर्शकता वाढविणे, वन्यजीव गणना अधिक अचूकपणे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचे नियोजन आणि ग्रीन कॉरिडोर निर्मिती या महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी तंत्रज्ञानाची जोड आणि पारदर्शक प्रशासनामुळे नाशिक विभागातील वनसंपदा अधिक समृद्ध होईल तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here