बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख ३० मे
बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख ३० मे
Bank of India अंतर्गत कार्यरत RSETI Gadchiroli येथे विविध प्रशिक्षण विषयांसाठी प्रशिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२६ आहे.
गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय रोड, बांधकाम भवन समोर, कॉम्प्लेक्स, मूल रोड येथे असलेल्या आरसेटी संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता :
पदवीधर उमेदवारांना प्राधान्य
किंवा
१२ वी उत्तीर्ण + संबंधित क्षेत्रातील ५ ते १० वर्षांचा अनुभव
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान
संगणकाचे ज्ञान आवश्यक
उपलब्ध प्रशिक्षण विषय :
ब्युटी पार्लर व्यवस्थापन
टेलरिंग
फास्ट फूड स्टॉल उद्योग
पापड, लोणचे व मसाला पावडर बनविणे
मोबाइल दुरुस्ती व सर्व्हिसिंग
संगणकीय अकाउंटिंग
शेळीपालन
कुक्कुटपालन
वेल्डिंग व फॅब्रिकेशन
दुग्ध व्यवसाय
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
कृषी उद्योग
आदी विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.