“यशस्वी १०० दिवस… जनसेवेचे, विश्वासाचे” : नवी मुंबई महापालिकेचा सुसंवाद कार्यक्रम संपन्न

0
30

नवी मुंबई महानगरपालिकाच्या सत्तास्थापनेला यशस्वी १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर “यशस्वी १०० दिवस… जनसेवेचे, विश्वासाचे” या संकल्पनेतून विशेष सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २० मे रोजी New Bombay Sports Association (NMSA), वाशी येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या गेल्या १०० दिवसांतील विविध विकासकामांचा, जनहिताच्या निर्णयांचा आणि नागरिकाभिमुख उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांशी थेट संवाद साधत प्रशासनाच्या कामकाजाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यासंदर्भातील सर्व माहिती सुजाता सूरज पाटील यांनी दिली. त्यांनी महापालिकेच्या आगामी योजनांबाबत तसेच शहर विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here