शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. आगामी राजकीय रणनीती, संघटन विस्तार आणि पक्षबांधणीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, खासदार निलेश लंके, अमर काळे, सुरेश म्हात्रे, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनवणे तसेच आमदार अभिजीत पाटील आणि राजू खरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांची तयारी आणि जनसंपर्क वाढविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात सक्रिय राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.


