ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर
रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
रायगड :
भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार १८ ते २० मे दरम्यान रायगड जिल्हा येथे हलका पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामानातील अचानक बदल आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः शेतकरी, मच्छीमार तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत थांबणे टाळावे, झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.