महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक; कोकणात विकासासोबत पर्यावरणीय प्रश्नही पुन्हा चर्चेत
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि विविध कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांसंदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या करारांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होणार असली तरी पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

बारसू येथे अदानी समूहाचा अणुऊर्जा प्रकल्प
Adani Power आणि Coastal-Maha Atomic Energy Limited यांच्या माध्यमातून बारसू येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सामंजस्य करार करण्यात आला.
- प्रस्तावित क्षमता : ६,००० मेगावॅट
- प्रस्तावित गुंतवणूक : ₹१.५० लाख कोटी
- रोजगार संधी : १२,०००
पूर्णगड येथे रिलायन्सचा SMR प्रकल्प
Reliance Industries Limited मार्फत पूर्णगड येथे Small Modular Reactor (SMR) आधारित अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.
-
प्रस्तावित क्षमता : २ X २२० MW ते ६ X १,२०० MW
-
प्रस्तावित गुंतवणूक : ₹८,००० कोटी ते ₹२ लाख कोटी
-
रोजगार संधी : १,०३,०००
देवगडमध्ये NTPC चा प्रकल्प
NTPC मार्फत देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आला.
-
प्रस्तावित क्षमता : ४,००० ते ७,२०० मेगावॅट
-
प्रस्तावित गुंतवणूक : ₹१ लाख कोटी
-
रोजगार संधी : ५,०००
या वेळी मंत्री अतुल सावे, विवेक शर्मा, रंजय शरण आणि NTPC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णदा प्रसाद सामल उपस्थित होते.
प्रकल्पांचे संभाव्य फायदे
-
कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती
-
ऊर्जा उत्पादन क्षमता वाढून औद्योगिक विकासाला चालना
-
रस्ते, बंदरे, वीज व इतर पायाभूत सुविधांचा विकास
-
स्थानिक व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि वाहतूक उद्योगाला फायदा
-
केंद्र आणि राज्य महसुलात वाढ


