NCERT विरोधातील आंदोलन २२ मे रोजी पुण्यात; शिवप्रेमी रस्त्यावर उतरणार
NCERT विरोधातील आंदोलन २२ मे रोजी पुण्यात; शिवप्रेमी रस्त्यावर उतरणार
पुणे :
मराठा साम्राज्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या गौरवाशी छेडछाड केल्याच्या आरोपांवरून २२ मे रोजी पुण्यात मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय (Lal Mahal ते Collector Office Pune) या मार्गावर काढण्यात येणार असून, विद्यार्थी, युवक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
NCERT च्या अभ्यासक्रमातील इतिहास संदर्भातील बदलांविरोधात संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” अशी भूमिका घेतली आहे.
या आंदोलनाद्वारे इतिहासातील कथित बदल मागे घेण्याची मागणी करण्यात येणार असून महाराष्ट्राचा आवाज रस्त्यावरून बुलंद करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.