महिला वाहकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक; हरवलेली पर्स प्रवासी महिलेला केली परत

0
72

पालघर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पालघर आगारातील महिला वाहक सौ. नेहा पाटील यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत प्रवासी महिलेची हरवलेली पर्स परत केली.
दिनांक २० मे २०२६ रोजी प्रवासादरम्यान एका महिलेची पर्स हरवली होती. ही पर्स आढळून आल्यानंतर सौ. नेहा पाटील यांनी तत्परता दाखवत संबंधित प्रवासी महिलेचा शोध घेऊन तिची पर्स सुरक्षितपणे परत केली.
या कृतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता आणि प्रवाशांप्रती असलेली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशा प्रसंगांमुळे एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सौ. नेहा पाटील यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल एसटी महामंडळाकडून तसेच प्रवाशांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here