रेवंडी गावच्या विकासासाठी वाट पहावी लागणार नाही – आमदार निलेश राणे
मसुरे प्रतिनिधी
रेवंडी गावच्या सर्व विकासात्मक प्रश्न आम्ही सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेली अनेक वर्ष हा गाव विकासापासून वंचित होता परंतु आता येथील विकासासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार नाही. जे प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन याल ते सर्व प्राधान्याने पूर्ण केले जातील. येथील रस्त्याचा प्रश्न गेली दहा वर्षे प्रलंबित होता आणि आज हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज सुटला आहे. यापुढे सुद्धा येथील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले जाणार आहेत असे आमदार निलेश राणे यांनी रेवंडी येथे बोलताना सांगितले..
कांबळी वाडा उत्कर्ष मंडळ रेवंडी यांच्या वतीने मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांचा सत्कार समारंभ आणि रेवंडी गावातील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा हृदय सत्कार कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नूतनीकरण केलेल्या कांबळीवाडा येथील रंगमंचाचे सुद्धा उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्या मीनाताई कांबळी, भाई मांजरेकर, मंडळाचे अध्यक्ष सुशील कांबळी, अशोक कांबळी, छोटू कांबळी, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी मॅडम,दीपक पाटकर,
तारक कांबळी, शरद कांबळी, प्रितेश मयेकर, प्रणित मयेकर, महेश कांबळी, शिवराज कांबळी, अंकुश कांबळी, अशोक कांबळी, मनोहर कांबळी, सुशांत कांबळी, चेतन कांबळी, सुशील कांबळी, प्रसाद कांबळी, किरण कांबळी, मिलिंद कांबळी, जगदीश कांबळी, श्रीपाद कांबळी, ध्रुव कांबळी, अमोल कांबळी, शिवनाथ कांबळी, मनीष कांबळी, ग्रीष्मा मिलिंद कांबळी, स्वरा शर्विन कांबळी, निलेश कांबळी, प्रकाश कांबळी, शरविन कांबळी, विवेक कांबळी, धीरज कांबळी, रविंद्र कांबळी, तुळशीदास कांबळी, विहान कांबळी, सचिन कांबळी, प्रमोद कांबळी, आनंद कांबळी, अनिल कांबळी, सुभाष मालवणकर, संतोष शेलटकर, समीर पोयरेकर, प्रथमेश पोयरेकर, संभाजी कांबळी, अजित कांबळी, अन्वी कांबळी, भार्गवी कांबळी, केतक मयेकर ,नेहा कांबळी, दीक्षा कांबळी, आप्पा कांबळी, प्रशांत कांबळी, दीपक कांबळी, सुप्रिया कांबळी लकी कांबळी आणि रेवंडी ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्या मीनाताई कांबळी म्हणाल्यात रेवंडी गावच्या रस्त्या प्रश्नासंदर्भात आमदार निलेश जी राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते आणि अवघ्या काही महिन्यातच निलेश राणे यांनी आपल्या आमदार निधीतून सदर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून रेवंडी गावच्या विकासाला चालना दिली आहे. खरोखरच खऱ्या अर्थाने माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्याच कार्याची छबी निलेश राणे यांच्या कार्यामध्ये दिसत आहे. भविष्यातही रेवंडी गावच्या मागे निलेश राणे खंबीरपणे उभे आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणालेत मालवण कुडाळ मतदार संघासाठी निलेश राणे यांनी करोडो रुपयांचा निधी आणला आहे. विधानसभेमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न मांडून मालवण कुडाळ साठी निधी खेचून आणण्याची धमक फक्त निलेश राणे यांच्यामध्येच आहे. गेली दहा वर्ष विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ पूर्णपणे मागे होता. परंतु आता तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे काम आमदार निलेश राणे करत असून भविष्यातही हा मतदार संघ आणि आपला रेवंडी गाव विकासाच्या सर्व कल्पना पूर्ण करेल. यावेळी येथील ग्रामस्थांनी रेवंडी गावच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता याबाबत आमदार निलेश राणे यांनी हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी लवकरच संबंधित सर्व अधिकारी वर्गाला निर्देश दिले जातील आणि जेथून पाण्याचा स्त्रोत निर्माण होईल त्या भागातून रेवंडी गावासाठी पाणी पुरवून हा प्रश्न प्रामुख्याने सोडविला जाईल असे अभिवचन दिले.
रेवंडी गावातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक आणि आभार अशोक कांबळी यांनी मानले.


