एलएल.बी. (५ वर्षे) CET 2026 परीक्षेबाबत आक्षेप / तक्रार नोंदविण्याची अंतिम तारीख २५ मे

0
32

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) घेण्यात आलेल्या एलएल.बी. (५ वर्षे) CET 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत उमेदवारांना आक्षेप किंवा तक्रार नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
परीक्षेतील कोणत्याही प्रश्नाबाबत, उत्तराबाबत किंवा तांत्रिक बाबींविषयी उमेदवारांना आक्षेप नोंदवायचा असल्यास तो २५ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहे. उमेदवारांनी संबंधित पुरावे आणि आवश्यक कागदपत्रांसह आपले आक्षेप निर्धारित कालावधीत सादर करावेत, असे CET सेलने स्पष्ट केले आहे.
निश्चित मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप किंवा तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका तपासून आवश्यक असल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here