महाऑनलाइन सॉफ्टवेअर बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; पालकांमध्ये चिंता

0
87
महाऑनलाइन सॉफ्टवेअर बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; पालकांमध्ये चिंता
महाऑनलाइन सॉफ्टवेअर बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; पालकांमध्ये चिंता

महाऑनलाइन सॉफ्टवेअर बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले; पालकांमध्ये चिंता

दहावी आणि बारावीच्या निकालानंतर शालेय व महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयातील महाऑनलाइन सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होत असताना, अचानक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर बदलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकून पडल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी प्रणालीमध्ये ११ कागदपत्रे स्वीकारली जात होती. मात्र नव्या अद्ययावत व्यवस्थेनंतर फक्त तीन कागदपत्रे स्वीकारली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमकी कोणती कागदपत्रे सादर करावीत, प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबाबत अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
या गोंधळामुळे अधिकारी आवश्यक स्वाक्षऱ्या देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. परिणामी, आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत न मिळाल्यास त्यांना प्रवेश प्रक्रियेत मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पालक संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केली असून, अडकलेले दाखले त्वरित मंजूर करावेत तसेच दाखल्याच्या पावतीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या आरक्षणातील जागा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सॉफ्टवेअर बदलाचे नेमके कारण स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here