जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त CSMT स्टेशन लाल रंगात उजळले

0
87
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त CSMT स्टेशन लाल रंगात उजळले
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त CSMT स्टेशन लाल रंगात उजळले

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त CSMT स्टेशन लाल रंगात उजळले

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिला आणि मुलींसाठी अधिक माहितीपूर्ण, सहाय्यक आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याचा संदेश देत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशन लाल रंगात उजळविण्यात आले.
मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, गैरसमज आणि कलंक दूर करणे तसेच महिलांच्या आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
“चला, कलंक दूर करूया आणि निरोगी भविष्याला प्रोत्साहन देऊया” असा संदेश यावेळी देण्यात आला. समाजात मासिक पाळीकडे आरोग्यदायी आणि संवेदनशील दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here