बाल हक्क संरक्षण आयोगाची सिंधुदुर्गात सुनावणी; २९ मे रोजी तक्रारींवर चर्चा
बाल हक्क संरक्षण आयोगाची सिंधुदुर्गात सुनावणी; २९ मे रोजी तक्रारींवर चर्चा
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने बालकांशी संबंधित प्राप्त तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करण्यासाठी शुक्रवार, दि. २९ मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग येथे सुनावणी आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृह, प्रशासकीय इमारत, पहिला मजला येथे सकाळी ११ वाजता सुनावणी तर दुपारी १२.३० वाजता आढावा बैठक पार पडणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय विष्णु पुराणिक, सचिव पंकज देवरे, सदस्य गितांजली बालाजी बुटी, शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई, प्रविण संजाबराव भजाडे, मिलन देवेंद्र जंगम तसेच आयोगातील अजय लोंढे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर हेही बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
बैठकीदरम्यान आरोग्य, शिक्षण, कामगार तसेच महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून बालकांच्या हक्कांशी संबंधित विविध तक्रारी आणि प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.