महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करणार; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

0
97

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्व पक्षांची सहमती नसली तरी तेलुगू देसम पक्ष (TDP) विधानमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करेल, असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
महिलांना राजकारणात अधिक संधी आणि प्रतिनिधित्व मिळावे यासाठी टीडीपी कटिबद्ध असल्याचे नायडू यांनी सांगितले. महिलांच्या सहभागाशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महिलांच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना नायडू यांच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here