रत्नागिरी पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचा गौरव
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते सत्कार

रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी Nitin Bagate यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले.


या सन्मान सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक Gajanan Bane, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक Bharat Jadhav, Narayan Sawant, Narayan Ale, Jaywant Sonawale, Nitin Pandere, Sunil Ayre, सहाय्यक पोलीस फौजदार Vinayak Jadhav, सहाय्यक आचारी Bharti Wadkar तसेच सफाईगार Shashikant Padayal यांचा सत्कार करण्यात आला.



