कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

0
59
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
छत्रपती संभाजीनगर, दि. १ जून : कृषि तंत्र विद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काबाबतची सविस्तर माहिती संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकीची मूलभूत माहिती, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कृषी क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन कृषि तंत्र विद्यालय प्रशासनाने केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here