सिंधुदुर्ग-रत्नागिरी- रायगड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक : ६ उमेदवारांचे १२ नामनिर्देशन पत्रे दाखल
मंगळवारी छाननी
रत्नागिरी — महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग-रायगड-रत्नागिरी- स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी अखेर ६ उमेदवारांनी एकूण १२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल (Manuj Jindal) यांनी दिली.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत ३० मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी १ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
तर १ जून रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४ नामनिर्देशन पत्रे, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १ नामनिर्देशन पत्र, मानसी संतोष म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १ नामनिर्देशन पत्र, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ नामनिर्देशन पत्र तसेच अनिकेत सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांनी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली.
याप्रमाणे एकूण ६ उमेदवारांकडून १२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.
दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवारी करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.