माजी खासदार आनंद परांजपे यांची शिवसेनेच्या राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्ती

0
47

मुंबई— शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून माजी खासदार आनंद परांजपे यांची शिवसेनेच्या राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाची तयारी मजबूत करणे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
आनंद परांजपे यांनी यापूर्वी खासदार म्हणून काम करताना विविध विकासकामे आणि जनसंपर्कातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा लाभ शिवसेनेला राज्यभरात मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनंतर राज्यातील शिवसेना संघटनेच्या विस्ताराला आणि पक्षाच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी आनंद परांजपे यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here