नागपूरच्या नमिरा सिद्दिकीची NEET MDS 2026 मध्ये देशात प्रथम

0
47
नागपूरच्या नमिरा सिद्दिकीची NEET MDS 2026 मध्ये देशात प्रथम
नागपूरच्या नमिरा सिद्दिकीची NEET MDS 2026 मध्ये देशात प्रथम

नागपूरच्या नमिरा सिद्दिकीची NEET MDS 2026 मध्ये देशात प्रथम

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

नागपूर, दि. — महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरलेल्या यशामध्ये नागपूर येथील स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलची विद्यार्थिनी नमिरा सिद्दिकी हिने NEET MDS 2026 परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक (AIR-1) प्राप्त केला आहे.
भंडारा जिल्ह्याची रहिवासी असलेल्या नमिराने आपल्या मेहनत, चिकाटी आणि उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर देशातील सर्वोच्च स्थान पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे राज्यातील तसेच देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
नमिराचे हे यश दृढनिश्चय, शिस्तबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उत्कृष्टतेचा ध्यास यांचे प्रतीक मानले जात आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
NEET MDS सारख्या राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवून नमिराने केवळ आपल्या महाविद्यालयाचेच नव्हे तर नागपूर, भंडारा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here