मालवण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले
मालवण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले
३० जून अंतिम मुदत
मालवण — मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र तसेच डिझेल इंजिनची देखभाल व परिचलन या विषयांवरील सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाच्या ८८ व्या सत्रासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग–मालवण येथे आयोजित करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक मच्छिमार युवकांनी दि. ३० जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. ग. मालवणकर यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता :
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.
आधार कार्ड व रेशन कार्डची छायाप्रत जोडणे आवश्यक.
उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत सादर करणे आवश्यक.
उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा.
अर्जावर संबंधित मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस असणे आवश्यक.
या प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत उपलब्ध अर्थसहाय्याचा लाभ घेऊन मासेमारी नौका उभारता येऊ शकते. तसेच पात्र उमेदवारांना सागरी नौकांवर खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
इच्छुक युवकांनी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करावेत. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून, आवश्यक कागदपत्रे व संस्थेची शिफारस जोडून ३० जून २०२६ पूर्वी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात सादर करावेत.
अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग-मालवण यांच्याशी मोबाईल क्रमांक ९४२२२१६२२० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.