ठाणे पोलिसांकडून गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना दिलासा

0
53
ठाणे पोलिसांकडून गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना दिलासा
ठाणे पोलिसांकडून गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना दिलासा

ठाणे पोलिसांकडून गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना दिलासा

तांत्रिक कौशल्याच्या जोरावर मोबाईल परत

ठाणे, दि. — ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करून गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देत नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलविले आहे.

कोपरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई कदम यांनी गहाळ झालेला रेडमी कंपनीचा मोबाईल शोधून संबंधित तक्रारदाराला परत केला. तसेच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विजय ताठे यांनी विविध कंपनीचे तब्बल सहा गहाळ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले.

याशिवाय मानपाडा परिसरात रिक्षा प्रवासादरम्यान एका महिलेचा मोटोरोला मोबाईल हरवला होता. या प्रकरणात पोलीस हवालदार पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेऊन तो संबंधित महिलेला परत केला.

गहाळ वस्तूंचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ठाणे पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी सतत कार्यरत असून नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता जपण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here