जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापौर निवासस्थान परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम

0
49

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापौर निवासस्थान परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमांतर्गत परिसर अधिक हिरवागार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मुंबईची प्रथम नागरिक म्हणून या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होताना निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भावी पिढीला शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी जीवन देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
“चला, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण एक झाड लावूया आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपला हातभार लावूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here