महाराष्ट्रात वैद्यकीय नोंदणी प्रक्रिया सुलभ; इतर राज्यांतील डॉक्टरांना मोठा दिलासा

0
56

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या मूळ राज्यातील वैद्यकीय परिषदेकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
केंद्र सरकारच्या डिरेग्युलेशन डॉकेट – फेस II अंतर्गत प्राधान्य क्षेत्र क्रमांक १९ तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १८ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
नवीन नियमानुसार, इतर राज्यांतील वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणीकृत असलेले डॉक्टर महाराष्ट्रात नोंदणीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्र सादर करतील. त्यानंतर त्यांना तत्काळ नोंदणी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार असून ते विनाविलंब राज्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकतील.
संपूर्ण नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असल्याने प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यात कुशल व अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांनाही बळकटी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here