बीएसएनएलच्या FTTH सेवेत रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात झेप

0
46
बीएसएनएलच्या FTTH सेवेत रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात झेप
बीएसएनएलच्या FTTH सेवेत रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात झेप
बीएसएनएलच्या FTTH सेवेत रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात झेप

महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक

रत्नागिरी, दि. ५ : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) रत्नागिरी कार्यालयात आयोजित विशेष व्यवसाय विकास बैठकीत (Business Development Meeting) बीएसएनएलच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स’ (TIP) चा गौरव करण्यात आला.
वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षात हाय-स्पीड इंटरनेट सेवा FTTH (Fiber To The Home) क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र परिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात सध्या ५,६०० हून अधिक FTTH कनेक्शन्स यशस्वीरीत्या कार्यरत असून बीएसएनएलच्या डिजिटल सेवांच्या विस्तारात मोठे यश मिळाले आहे.
याचबरोबर बीएसएनएलच्या दीप्ती पंडित यांनी ‘एफएम नोडल’ (FM Nodal) म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या यशामध्ये बीएसएनएलच्या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सचा मोठा वाटा असून, बीएसएनएल रत्नागिरीच्या उपमहाप्रबंधक (प्रचालन) अमृता लेले यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भागीदारांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त भागीदार

🥇 प्रथम क्रमांक : श्रीशा एंटरप्रायझेस, रत्नागिरी (विकास संगरे)
🥈 द्वितीय क्रमांक : महापुरुष एंटरप्रायझेस, संगमेश्वर (नीलेश उर्फ राजू पेडणेकर)
या दोन्ही भागीदारांनी २०२५-२६ या वर्षात रत्नागिरी व संगमेश्वर परिसरात मिळून ४०० हून अधिक नवीन FTTH कनेक्शन्स उपलब्ध करून देत बीएसएनएलची सेवा घराघरांत पोहोचवली.
कार्यक्रमात कोल्हापूरचे महाप्रबंधक अरविंद पाटील तसेच मुंबई येथील मुख्य महाप्रबंधक कार्यालयाच्या उपमहाप्रबंधक (FTTH) कल्पना पटेल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत पुरस्कारप्राप्त भागीदार व रत्नागिरी टीमचे कौतुक केले.

नवीन उद्योजकांना आवाहन

बीएसएनएलने स्थानिक उद्योजकांना ‘टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर’ (TIP) म्हणून सहभागी होऊन व्यवसायाच्या नवीन संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी बीएसएनएलच्या हाय-स्पीड आणि विश्वासार्ह FTTH इंटरनेट सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दीप्ती पंडित यांच्याशी ९४२२७८९२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here