बारामती आगारात १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेचे लोकार्पण
बारामती आगारात १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेचे लोकार्पण
बारामती आगारात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव (Sachin Satav) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बारामती बसस्थानकाने स्वच्छता, प्रवासी सुविधा, वेळेचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या बाबतीत आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बसस्थानक परिसर आणि बसमधील स्वच्छता, बस वेळेवर सोडणे, प्रवाशांच्या समस्या तत्काळ सोडविणे आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे यावर राज्य परिवहन महामंडळाने अधिक भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
बारामती बसस्थानकाला राज्यातील प्रथम पुरस्कार मिळणे ही संपूर्ण बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामुळे नागरिकांची जबाबदारीही वाढली असल्याचे सांगत श्रीमती पवार यांनी बारामतीकर तसेच एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.