प्रभादेवीतील विराट हिंदू संमेलनात पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

0
20

मुंबईतील प्रभादेवी येथील कपिदास श्रीराम वस्ती, तुळसीनगर येथे प्रभादेवी हिंदू एकता आणि भवानी माता सोसायटी यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना हिंदू समाज अधिक शक्तिशाली, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी समाजाचे संघटन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जात, पंथ, भाषा आणि प्रांतीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी प्रथम हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.
संघटित समाजच आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि राष्ट्रहिताचे प्रभावीपणे संरक्षण करू शकतो. सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रहितासाठी एकजूट महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here