उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन दरम्यान एकेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्रमांक ०११७३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन विशेष गाडी रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी धावणार आहे.
ही विशेष गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून दुपारी ११.३० वाजता सुटणार असून कोकण मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे वाढलेल्या प्रवासी संख्येचा विचार करून ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी आरक्षण करून या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.