डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

0
41

डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थान (Shri Pimpaleshwar Mahadev Devasthan) येथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचा जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.
तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थानाला मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे नाममात्र दराने ४ एकर २५ गुंठे भूखंड उपलब्ध करून दिल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले.
कार्यक्रमास Uday Samant, Shrikant Shinde, Ravindra Chavan, Kisan Kathore, Kumar Ailani, Sulabha Gaikwad, Rajesh More यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मंदिरासाठी सुरू असलेल्या दीर्घ संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून हा सर्व महादेव भक्तांचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, उपलब्ध करून देण्यात आलेली संपूर्ण जमीन आता पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here