शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

0
41
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

शहीद जवान प्रवीण जंजाळ ( Pravin Prabhakar Janjal )यांना त्यांच्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ या देशातील प्रतिष्ठित शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष ‘रक्षा अलंकरण’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांची पत्नी श्रीमती श्यामबाला जंजाळ आणि आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे (Morgaon Bhakre) येथील रहिवासी असलेले प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंट (Mahar Regiment) च्या पहिल्या बटालियनमध्ये तसेच राष्ट्रीय रायफल्सचे (Rashtriya Rifles) मध्ये शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान त्यांनी दाखविलेल्या असामान्य धैर्य, शौर्य आणि राष्ट्रसेवेसाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या गौरवार्थ त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) , केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi),  यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी, केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

शहीद प्रवीण जंजाळ यांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती देशवासीयांसाठी कायम प्रेरणादायी राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here