राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू होणार

0
50
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू होणार
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू होणार

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू होणार

राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
ही घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil ) यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत केली.
बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव  बी. वेणुगोपाल रेड्डी (B. Venugopal Reddy), महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई (Maharashtra State Common Entrance Test Cell चे आयुक्त Dilip Sardesai ), तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर (Dr. Vinod Mohitkar), उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर (Shailendra Deolankar),  तंत्र शिक्षण संचालक , उच्च शिक्षण संचालक  तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते.
यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होणाऱ्या सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, शिष्यवृत्ती योजना आणि विविध शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जिल्ह्यातच तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होऊन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here