भारतीय नौदलासाठी २० ECGNSS जॅमर्स खरेदीचा ₹४४९ कोटींचा करार

0
39
भारतीय नौदलासाठी २० ECGNSS जॅमर्स खरेदीचा ₹४४९ कोटींचा करार
भारतीय नौदलासाठी २० ECGNSS जॅमर्स खरेदीचा ₹४४९ कोटींचा करार
भारतीय नौदलासाठी २० ECGNSS जॅमर्स खरेदीचा ₹४४९ कोटींचा करार
संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलाची क्षमता अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत २० एन्हांस्ड कॅपॅबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (ECGNSS) जॅमर्स खरेदीसाठी करार केला आहे.
या करारासाठी संरक्षण मंत्रालयाने जॅमर्सच्या खरेदीसाठी बंगळूरु येथील अकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (Accord Software & Systems Pvt. Ltd). या कंपनीसोबत ₹४४९ कोटींचा करार केला आहे. करारामध्ये किमान ७५ टक्के स्वदेशी सामग्रीचा समावेश असणार आहे.
हा करार ‘खरेदी (भारतीय-स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि उत्पादित)’ या श्रेणीअंतर्गत १० जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आला. यावेळी संरक्षण सचिव श्री राजेश कुमार सिंह (Rajesh Kumar Singh ) उपस्थित होते.

या अत्याधुनिक ‘खरेदी (भारतीय-स्वदेशी बनावटीचे, विकसित आणि उत्पादित)’ ECGNSS जॅमर्समुळे भारतीय नौदलाला शत्रूच्या उपग्रह-आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये अडथळे निर्माण करण्याची क्षमता मिळणार असून सागरी सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांना चालना देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here