डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न निंदनीय – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
41

मुंबई –
मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha ) यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचे नाव मुंबईतील मांडवी येथील शासकीय आयटीआय वरून बदलण्याच्या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त करत हा प्रयत्न निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून २०२४ मध्ये राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईतील मांडवी येथील शासकीय आयटीआयला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले होते.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, डॉ. कलाम यांचे विज्ञान, शिक्षण, राष्ट्रनिर्माण आणि युवा पिढीला प्रेरणा देणारे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि भावी पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले होते.
यावेळी त्यांनी आरोप केला की आमदार अमीन पटेल (Amin Patel) यांनी संबंधित आयटीआयचे नाव बदलून हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विभागासमोर मांडला होता. मात्र हा प्रस्ताव शासनाने ठामपणे फेटाळला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांचे राष्ट्रासाठीचे योगदान वंदनीय असून त्यांचे नाव पुसण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, असेही मंत्री लोढा यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here