ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी यांची महापौर रितू तावडे यांना सदिच्छा भेट

0
48

भारतीय नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी (Manoj Joshi ) यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde)  यांची सदिच्छा भेट घेतली.
आपल्या सहजसुंदर आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे मनोज जोशी यांनी यावेळी कला, संस्कृती तसेच विविध सामाजिक विषयांवर महापौर ऋतू तावडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच समाजातील विविध घडामोडींवरही चर्चा झाली. कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव व्यक्त करण्यात आला.
मनोज जोशी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, अभ्यासू आणि जमिनीशी नाळ जोडून ठेवणारे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांची ही सदिच्छा भेट आनंददायी आणि संस्मरणीय ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here