रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना : अडचण आल्यास ‘१३९’ हेल्पलाईनवर संपर्क साधा
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना : अडचण आल्यास ‘१३९’ हेल्पलाईनवर संपर्क साधा
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि त्रासमुक्त व्हावा यासाठी भारतीय रेल्वेची ‘१३९’ हेल्पलाईन सेवा २४x७ उपलब्ध आहे.
प्रवासादरम्यान कोणतीही तक्रार, वैद्यकीय मदतीची आवश्यकता, स्वच्छतेसंबंधी समस्या, खानपान सेवा, सुरक्षा, हरवलेले सामान किंवा इतर कोणत्याही सुविधेबाबत अडचण असल्यास प्रवाशांनी १३९ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी ही सेवा कार्यरत असून, आपत्कालीन परिस्थितीतही ती उपयुक्त ठरते.
“तुमचा प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा हेच आमचे ध्येय!”