ठाणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
ठाणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
जिल्हा परिषद, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (Ranjit Yadav ) तसेच आमदार, विधान परिषद निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare) यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर बैठक पार पडली.
बैठकीत शिक्षक पदोन्नती प्रक्रिया, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शिक्षकांना S-14 वेतनश्रेणी लागू करणे तसेच पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीसंदर्भातील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने संबंधित विषयांवरील सद्यस्थिती स्पष्ट करत नियमबद्ध, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका मांडली. शिक्षकांच्या विविध मागण्या आणि अडचणींबाबत सकारात्मक संवाद साधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात आली.
शिक्षक हिताला प्राधान्य देत शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.