MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल,राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार
महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा १४ जूनला; सिंधुदुर्गात १,०६६ उमेदवार परीक्षा देणार
सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ रविवार, १४ जून २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडणार आहे. जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात दोन तर कुडाळ तालुक्यात एक अशा एकूण तीन उपकेंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत एका सत्रात घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील एकूण १,०६६ उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत.
उपकेंद्रे व बैठक क्रमांक
🔹 विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली बैठक क्रमांक : 2700001 ते 2700336
🔹 कणकवली कॉलेज, कणकवली बैठक क्रमांक : 2700337 ते 2700720
🔹 कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कुडाळ बैठक क्रमांक : 2700721 ते 2701066
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी ही माहिती दिली असून परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
गैरप्रकारांवर कडक कारवाईचा इशारा
परीक्षेदरम्यान कॉपी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयोगाकडून फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेची शुचिता राखण्यासाठी आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे.
उमेदवारांची परीक्षा केंद्रांवर प्रवेशापूर्वी नियुक्त सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांमार्फत फ्रिस्किंग (तपासणी) करण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून विशेष निरीक्षक व भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून संपूर्ण परीक्षेवर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष ठेवणार आहेत.
उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.