मान्सूनपूर्व नालेसफाईतील त्रुटींवर बीएमसीची कारवाई; कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड

0
19

मुंबई : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततांवर कठोर भूमिका घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) संबंधित कंत्राटदारांवर एकूण ९.२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बीएमसीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित देखरेख प्रणालीने अनेक गंभीर त्रुटी आणि नियमभंग उघडकीस आणल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदारांच्या प्रलंबित बिलांमधून ही दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. एआय प्रणालीच्या तपासणीत प्रतिमांचा पुनर्वापर, अनलोडिंगचे अनिवार्य व्हिडिओ अपलोड न करणे, नोंदणीकृत वाहने आणि वर्क कोडमधील तफावत, छायाचित्रांचा अभाव तसेच गाळ वाहतूक व विल्हेवाट प्रक्रियेत अनियमितता आढळून आली.
याशिवाय प्रत्यक्ष पाहणीत कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळाची कमतरता, कामगारांना सुरक्षा साधने न देणे, उपसलेल्या गाळाची अयोग्य विल्हेवाट आणि निर्धारित मुदतीत काम पूर्ण न करणे अशा गंभीर बाबीही समोर आल्या.
मुंबईत दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामांमध्ये पारदर्शकता वाढली असून गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here