मुंबई कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाची पाहणी; वाहतूक कोंडीमुक्त मुंबईसाठी कामांना वेग

0
22
मुंबई कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाची पाहणी
मुंबई कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाची पाहणी

मुंबई कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाची पाहणी; वाहतूक कोंडीमुक्त मुंबईसाठी कामांना वेग

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि आरामदायी करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीपथावरील कामांची आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहराला जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी महापौर तावडे यांनी सांगितले. कोस्टल रोडच्या या विस्तारित प्रकल्पामुळे विशेषतः पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे.
पाहणी दौऱ्यावेळी कॅबिनेट मंत्री अॅड. आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात असून, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here