कोल्हापुरात एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा शांततेत; १५,७३५ उमेदवारांची उपस्थिती

0
18
कोल्हापुरात एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा शांततेत; १५,७३५ उमेदवारांची उपस्थिती
कोल्हापुरात एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा शांततेत; १५,७३५ उमेदवारांची उपस्थिती

कोल्हापुरात एमपीएससी गट-ब पूर्व परीक्षा शांततेत; १५,७३५ उमेदवारांची उपस्थिती

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ रविवारी (१४ जून) कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील ६२ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण १८,९८५ उमेदवार नोंदणीकृत होते. त्यापैकी १५,७३५ उमेदवार उपस्थित, तर ३,२५० उमेदवार अनुपस्थित राहिले.
कोपार्डे, सांगरूळ, कुडीत्रे, कागल, इचलकरंजी, वाठार, वडगाव, अतिग्रे तसेच कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालये व शाळांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती.
प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक पडताळणी आणि फ्रिस्किंग करण्यात आली. तसेच सर्व परीक्षा केंद्रांतील खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष निरीक्षक तसेच विविध स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ९२१ समवेक्षक, १६ समन्वय अधिकारी, २७७ पर्यवेक्षक, ५०२ शिपाई कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाज पार पाडले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक गजानन गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here