पावसाळ्यात माथेरान टॉय ट्रेन सेवेत बदल; नेरळ–अमन लॉज सेवा १५ ऑक्टोबरपर्यंत बंद

0
16

माथेरान : पावसाळी हंगामात सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावरील नेरळ–अमन लॉज दरम्यानची नियमित प्रवासी सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी माथेरान–अमन लॉज दरम्यान शटल सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना टॉय ट्रेनचा आनंद घेता येणार आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दररोज सहा शटल फेऱ्या चालविण्यात येणार असून शनिवार व रविवार विशेष फेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात माथेरान परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाचे

✅ नेरळ – अमन लॉज सेवा बंद : १५ जून ते १५ ऑक्टोबर २०२६
✅ माथेरान – अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार
✅ शनिवार-रविवारी विशेष फेऱ्या उपलब्ध
✅ पावसाळी सुरक्षिततेसाठी निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here