सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचा इशारा; परप्रांतीयांच्या भरतीवरून संतप्त बॅनरबाजी

0
20

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकाच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावण्यात आलेल्या एका बॅनरने प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. “हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भरती; आता मनसेच उतरवणार यांची मस्ती…” असा मजकूर असलेला हा बॅनर स्थानक परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मनसे आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनरमधून विविध संस्था, आस्थापना आणि सेवांमध्ये मराठी युवकांना डावलून परप्रांतीयांची भरती होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मराठी भाषा आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, अशी भूमिका मनसेने यापूर्वीही अनेकदा मांडली असून त्याचाच हा पुढचा भाग मानला जात आहे.
रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी हा बॅनर झळकल्याने प्रवाशांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी काळात या मुद्द्यावर मनसेकडून आंदोलनाची भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here