कलमठ येथील शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती; चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

0
26
कलमठ येथील शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
कलमठ येथील शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

कलमठ येथील शाळा प्रवेशोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती; चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

कणकवली –
कणकवली तालुक्यातील कलमठ येथील कुंभारवाडी प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या “शाळा प्रवेशोत्सव” कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनंदाने सहभागी करून घेण्याचा संदेश देण्यात आला. शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणे, पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांविषयी सकारात्मक वातावरण तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
प्रत्येक बालकाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवावे आणि सिंधुदुर्ग जिल्हा “शिक्षणसमृद्ध जिल्हा” म्हणून अधिक सक्षम व्हावा, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाबाबत उत्साह निर्माण होण्यास आणि शाळांमध्ये प्रवेशाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास तृप्ती धोडमिसे, रवींद्र खेबुडकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री तसेच पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here