दिव्यांगांच्या समस्या व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

0
21
दिव्यांगांच्या समस्या व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
दिव्यांगांच्या समस्या व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

दिव्यांगांच्या समस्या व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

तातडीने कार्यवाहीचे निर्देश

सिंधुदुर्ग –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यांगांच्या कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत अंथरुणाला खिळलेल्या दिव्यांगांना यूडीआयडी (UDID) अपंगत्व कार्ड विनाविलंब उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही दिव्यांगाची पेन्शन प्रलंबित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधींनी बाल संगोपन योजनेतील त्रुटी दूर करणे, अंत्योदय योजनेचा लाभ सर्व पात्र दिव्यांगांना मिळावा, कर्ज योजनांमध्ये सरकारी नोकरी असलेल्या जामीनदाराची अट शिथिल करणे, जिल्ह्यात स्वतंत्र दिव्यांग भवन उभारणे तसेच सरकारी जागेवर २०० चौरस फुटांचे स्टॉल दिव्यांगांना उपलब्ध करून देणे आदी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, यावर भर देण्यात आला.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, तृप्ती धोडमिसे, प्रमोद कामत, संतोष चिकणे, साई कृपा शिक्षण अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, दिव्यांग एकता संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सुनील तांबे, श्यामसुंदर लोट तसेच विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here