महाआरोग्य शिबिराचे आयोजन : म्हापण-पाट येथे १७ जून रोजी तज्ज्ञ डॉक्टर करणार मोफत तपासणी

0
25

म्हापण, वेंगुर्ला/संदिप चव्हाण –
आकाश फीश मिल अँण्ड फिश ऑईल प्रा. लि. आणि एस.एस. पियम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापण-पाट येथे भव्य ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १७ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून हे शिबिर पाट भैरव मंदिर जवळ, मतकरी वाडी-पाट येथील आदिशक्ती मंगल कार्यालयात होणार आहे.
या शिबिरात खालील विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे:
– जनरल मेडिसिन
– कान, नाक, घसा (ENT)
– नेत्र विभाग
– दंतचिकित्सा विभाग
– स्त्रीरोग व प्रसुती विभाग
– अस्थिरोग विभाग
– बालरोग विभाग
याशिवाय गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ई.सी.जी, डायबेटिस तपासणी तसेच इतर आवश्यक तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत.
महत्त्वाची सूचना:
शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना नागरिकांनी सोबत आभा कार्ड, आधार कार्ड आणि आधारला संलग्न असलेला मोबाईल नंबर आणणे अनिवार्य आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
8390005994 / 7798294048
तरी परिसरातील म्हापण, पाट, वेंगुर्ला व आजूबाजूच्या गावांतील सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here